न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- पीडित महिलेच्या फोटोतील चेहऱ्याचा वापर करून अश्लिल व्हिडीओ तयार केले व ते पीडितेचा अपमान करण्याच्या हेतुने राडा नावाच्या ग्रुपवर आरोपीने टाकले. ही घटना ३० ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत राडा नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर घडली.
राडा नावाच्या ग्रुप अॅडमीन (नाव पत्ता माहिती नाही) ९७३०१५०६४४ / व दुसरा अॅडमीन ८३०८६६७८६१ यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढिल तपास करत आहेत.