न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- मॅट्रीमोनिअल साईटवरून फिर्यादी यांची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. महिलेने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले.
आईच्या उपचारासाठी म्हणून तिच्या मैत्रिणीच्या सहाय्यान फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी बँक खाते व मोबाईलवर ऑनलाईन पेमेंटद्वारे २ लाख ६५ हजार रुपये काढून घेतले.
ही घटना ९ जून २०२२ ते २३ जुलै २०२२ या दरम्यान घडली. रणजित पुरुषोत्तम इंगळे (वय ४४ रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दोन महिलां विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.