- भोसरीतील घटना; सोन्या चांदीसह रोख रकमेची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. एक लाख ३४ हजारांचे सोन्याचे दागिने, १६ हजारांचे चांदीचे दागिने, दोन लाख २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
फिर्यादी हे शनिवारी दुपारी त्यांच्या गावी गेले असता त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. रविवारी पहाटे फिर्यादी गावाहून परत आले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. शनिवारी (दि. १७) दुपारी दीड ते रविवारी (दि. १८) पहाटे सव्वापाचच्या सुमारास दिघी रोड, भोसरी येथे हा प्रकार घडला.
कुंडलिक बबनराव पिंपरकर (वय ५४, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.