न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२२) :- दोन कारमध्ये गोवंश सदृश्य मांस विक्रीसाठी वाहतूक केली. माहिती मिळताच पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे सापळा लावला. दोन कार ताब्यात घेतल्या. त्यामध्ये गोवंश सदृश मांस आढळून आले.
पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी येथे रविवारी (दि. १८) पहाटे सव्वापाच वाजता हा प्रकार घडला. पोलीस शिपाई श्रीकांत एनगुंदल यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आदिल रशीद शेख (वय २५, रा. रामवाडी, जि. अहमदनगर), रहमुद्दीन मेहबूब कुरेशी (वय ३०, रा. माजलगाव, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.