- महावितरणाच्या सहायक अभियंत्यास मारहाण करीत धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२२) :- वीजजोडणी खंडित कट केल्याच्या रागातून तरुणाने महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास मारहाण केली. तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. ९) दुपारी पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
विक्रम गुलाब राठोड (वय ३९ रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ओंकार ऊर्फ विकी नवधने (वय २५, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम राठोड हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तळेगाव दाभाडे येथे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. स्टेशन शाखा-१ येथे सहायक आरोपीकडे महावितरण कंपनीचे वीजमीटर आहे. त्याचे वीजबिल चुकीचे आले होते. त्यामध्ये दुरुस्त करून बिल बरोबर करून दिले होते. वीज बिलाबाबत आरोपी महिन्याभरापूर्वी फिर्यादी यांच्या कार्यालयात आला होता. त्यावेळ त्याने शिवीगाळ केली होती. त्यानंतर चुकीचे वीजबिल दुरुस्त करून देऊन रक्कम भरण्याबाबत आरोपीला सांगण्यात आले. त्याबाबत त्याला एसएमएस केला होता. आरोपीने बिल भरले नाही. त्यामुळे आरोपीची वीज जोडणी खंडित (वीज कनेक्शन कट) करण्यात आली. याचा राग मनात धरून आरोपी फिर्यादीच्या कार्यालयात आल . हे चुकीचे केले आहे, असे आरोपी फिर्यादीला म्हणाला. तसेच त्याने फिर्यादीला मारहाण केली. तू.. एफआयआर तर कर, मी नंतर येऊन तुला ठेचतो, अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली.