न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२२) :- सप्टेंबर महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीत पिंपरी – चिंचवड शहरातील १६४ नोंदी निकाली काढण्यात आल्या आहेत. नुकत्याच जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीस प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये एकूण तीन हजार ९८७ नोंदी निकाली काढण्यात आल्या.
राज्य शासनाकडून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. ई फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निकाली काढण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार आदालती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीत पिंपरी चिंचवडमधील १६४ फेरफार नोंदी निकालात काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.