- सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी १ ऑक्टोबरपासून कार्ड टोकनायझेशन प्रणालीचा अवलंब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- ऑनलाइन खरेदी आता अधिक सुरक्षित होणार आहे. सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी व डेबिट क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आरबीआय आता १ ऑक्टोबरपासून कार्ड टोकनायझेशन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. कार्ड टोकनायझेशन प्रणालीच्या अंतर्गत डेबिट – क्रेडिट कार्डचे डिटेल्स, जसे की १६ अंकी क्रमांक, नाव, कार्ड वापरण्याचा कालावधी संपण्याची तारीख आणि सीव्हीही देताना एक चार किंवा सहा क्रमाकांचा युनिक नंबर देण्यात येईल.
ज्याच्या माध्यमातून सर्व प्रकराची खरेदी आणि पेमेंट करता येणार आहे. हा युनिक टोकन क्रमांक ग्राहकाची कोणतीही माहिती न देता पेमेंट करण्यास मंजुरी देईल. यानंतर व्यापारी तुमच्या कार्डची डिटेल्स आपल्याकडे सेव्ह करू शकणार नाहीत. व्यापाऱ्यांकडे केवळ आपले टोकन जाईल. रूपे, व्हिसा, मास्टरकार्ड यांसाठी टोकन देण्यात येणार आहे.
ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहणार. ग्राहकांचे अधिकार वाढणार आहेत. ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार अतिशय कमी होणार आहे. रोजचे व्यवहार किती रकमेपर्यंत करावेत हे ग्राहक स्वत: ठरवणार आहेत.
यासाठी ग्राहक ॲपमधून तयार झालेला युनिक टोकन क्रमांक पेमेंटसाठी एंटर करतील. मर्चंट प्लॅटफॉर्म बंधित बँकेकडे पाठवले जाईल. त्यानंतर बँक टोकनला कार्ड नेटवर्ककडे पाठवेल. बॅक टोकनचा डेटा बँकेच्या व्हॉल्टमध्ये सुरक्षित राहील. त्यानंतर टोकन संबंधित बँकेकडे पाठवले जाईल. नेटवर्क टोकनसोबत पॅन, वैयक्तिक खाते क्रमांक, इतर माहिती बँकेला पाठवेल. जारी करणारी बँक रकमेला तपासून घेत व्यवहाराला मंजुरी देईल.















