न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात मे महिन्यापासून वाहन परवान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहन परवान्याचे ‘ स्मार्ट कार्ड ‘ तयार करताना त्याला मायक्रोचीप लावली जाते. ही मायक्रोचीप बनविण्याचे साहित्य युक्रेन, रशिया या देशातून येते. सद्या या दोन देशात युद्ध सुरू असल्याने या साहित्याचा तुटवडा भासत आहे. परिणामी शहरातील सुमारे २१ हजारांहून अधिक वाहन परवाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वितरीत करण्यात आलेले नाहीत..
आता ही समस्या मिटली असून, नागरिकांना लवकरच घरपोच वाहन परवाने मिळतील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी देत आहेत; परंतु संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांना दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरीही वाहन परवाना घरपोच मिळाला नसल्याच्या तक्रारी सुरूच आहेत.
नागरिकांच्या वाहन परवान्याचा प्रश्न आता संपलेला आहे. पूर्वीप्रमाणेच वाहन परवाने नागरिकांना लवकरच घरपोच मिळतील.
-अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिं.चिं. शहर…















