न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२२) :- आरोपीची पत्नी म्हणजेच फिर्यादीची मुलगी ही आरोपी पतीकडे नांदायला जात नाही. तसेच फिर्यादी मुलीला नांदायला पाठवत नाही, असा आरोपीचा संशय आहे. तसेच फिर्यादीचा मुलगा आरोपीवरील गाडी जाळल्याची केस मागे घेत नाही.
या रागातून मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपीने त्याच्या मेहुण्याच्या गळ्यावर कटरने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काळेवाडी येथे घडला. महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा जावई सचिन शिवाजी अतकरे (वय ३०, रा. सारने सांगवी, ता. केज, जि बीड) याला पोलिसांनी अटक केली आहे.