न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२२) :- देहूरोड येथील आयुध निर्मानी समोरील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर मोटार उभी करून फिर्यादी त्यामध्ये झोपले होते. दरम्यान, तेथे आलेल्या तिघांनी मोटारीवर हात मारून त्यांना जागे केले. ते बाहेर आले असता त्यांच्याकडे पैसे व मोबाईलची मागणी केली.
फिर्यादीकडील दोन हजारांचा मोबाईल हिसकावला. ही घटना शेजारील टेम्पो चालकाने पहिल्याने त्याने हॉर्न वाजवला. आरोपींनी त्या टेम्पोच्याही काचा फोडून पलायन केले. हा प्रकार बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडला. आकाश प्रकाश लोखंडे (रा. खोपोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.