न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२२) :- वायसीएम रुग्णालयाच्या मागील रस्त्यावर ऑइल सांडले होते. या ऑइलमुळे दोन ते तीन दुचाकी स्लीप होऊन पडल्या होत्या. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी बंब दाखल झाला.
कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील ऑइल साफ केले. कामावर येत असताना आज गुरुवारी (दि. २२) रोजी ही घटना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आली होती. त्यांनी वरिष्ठांना वेळेत माहिती दिली व पुढील अनर्थ टळला, अशी माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे सारंग मंगलुरकर यांनी दिली.