न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२२) :- आपसात संगनमत करून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपये कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी २ लाख ४५ हजार रुपये घेतले.
पैसे घेऊन कर्ज मंजूर करून दिले नाही.फिर्यादी यांनी आरोपींना फोन करून विचारणा केली असता आरोपींनी त्यांना धमकी दिली. हा प्रकार काळेवाडी फाटा येथे घडला. अमोल माणिकराव पाचपुते (वय ४१, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालाजी बळीराम घोडके (वय ३२), संग्राम यादव (वय ४५), मुजावर फायनान्सचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.