- छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धवसेनेला कोर्टाची परवानगी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाने पालिकेकडे अर्ज केला होता. परंतु मुंबई महानगरपालिकेने कायदा सुव्यवस्थेचा हवाला देत दोन्ही गटांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली होती. त्यामुळे शिवसेनेने या प्रकरणी कोर्टात धाव घेतली. आज कोर्टाने शिंदे गटाचा, शिवसेनेचा आणि मुंबई पालिकेचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने पालिकेचा निर्णय अंतिम नसल्याचे म्हटले तसेच पालिकेने अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे सांगत कोर्टाने शिवसेनेला शिवाजी पार्कावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केलं. यावेळी पालिकेने 2017 मध्ये कशी परवानगी दिली हे पाहवं लागेल, असं न्यायाधीश म्हणाले. 2016 च्या आधी शिवसेनेला परवानगी मिळाली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून होतोय. खरी शिवसेना कुणाचा यात आम्हाला जायचं नाही. 22 आणि 26 दोन्ही तारखेचे अर्ज पालिकेला आलेले होते. पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याची याचिका आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं.
पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असं कोर्टाने म्हटलं. यावेळी कोर्टाने पालिका प्रशासनालाही सुनावलं. पालिकेचा निर्णय अंतिम नाही. दुसऱ्या गटाच्या अर्जाबाबत पालिकेला माहिती होतं. मुंबई पालिकेचा निर्णय तथ्यात्मक नाही. मुंबई पालिकेने कायद्याचा दुरुपयोग केला, असं कोर्टाने स्पष्ट म्हटलं.















