न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- सांगवी पोलिस ठाण्यात ड्यूटीवर असताना एकजण तक्रार देण्यासाठी आला. दरम्यान, त्याचे मित्र असणारे आरोपी तेथे आले. आकाशाची तक्रार घ्यायची नाही असे म्हणत अरेरावीची भाषा केली. ‘तुमची नोकरी घालवतो’, अशी फिर्यादीला धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी सहायक फौजदार विजय सर्जेराव शेलार यांनी फिर्याद दिली आहे. अनिकेत मनोज चव्हाण (वय २८, रा. कवडेनगर, नवी सांगवी), अक्षय संभाजी शिंदे (वय २३, रा. कृष्णराज कॉलनी, पिंपळे गुरव), ओंकार सुधाकर घाडगे (रा. कवडेनगर, नवी सांगवी) अशी आरोपींची नावे आहेत. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.















