न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- म्हाळुंगेत २१ वर्षीय तरुणी तिच्या घरी एकटीच होती. प्रेम संबंधांमुळे वारंवार होत असलेल्या भांडणाचा राग मनात धरून तिच्यावर प्रियकराने धारदार हत्याराने वार केले.
यामध्ये ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आहे. गजानन अंगद चौधरी (वय ३१, रा. म्हाळुंगे) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.















