न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२२) :- मॉन्जिनीज कंपनीचे केक शॉप सुरु करण्यासाठी फिर्यादीने ऑनलाईन माहिती घेतली. त्यांनी 18001216986 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने फिर्यादीना support@monginisstoredealership.co.in या ई-मेल आयडीवर अर्ज करण्यास सांगितले.
फिर्यादी यांना तीन बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यावर १२ लाख १२ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल सामान, केकचे प्रकार पाठविण्यात येणार होते. मात्र आरोपींनी त्यांना केक शॉप संबंधित कोणतेही सामान न पाठवता त्यांची फसवणूक केली.
ही घटना ८ ते २० सप्टेंबर या दरम्यान ऑनलाईन द्वारे घडली. राजेश किरणचंद संघवी (वय ५३, रा. रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9593203357 क्रमांकावरून बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.















