न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२२) :- पिंपरीतील डॉ.डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आरोपीचे आजोबा दाखल होते. त्यांच्या कमरेमध्ये फ्रॅक्चर असल्याने त्यांच्यावर ऑपरेशन करायचे होते.
मात्र, आरोपीने फिर्यादी डॉक्टरला पेशंटला कोठेही हालवायचे नाही. गरज असेल तर तुमच्या कार्डीयाक डॉक्टरांनाच तुम्ही येथे बोलवा म्हणून जोरजोरात शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. ही घटना शुक्रवारी (दि. २३) सकाळी आठ वाजता घडली आहे.
डॉ. शिवाप्पा रविंद्र देवरमनी (वय २६, रा. डी.वाय.पाटील मेडीकल हॉस्पिटल बॉईज हॉस्टेल) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्गेश राजन पुराणिक (वय २८, रा. मोशी) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.















