न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- नवरात्रोत्सवानिमित्त चिंचवड पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरातील मंडळांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीस शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी मंडळांना विविध सूचना, मार्गदर्शन केले. मंडळांनी उत्सवादरम्यान घ्यावयाची काळजी, देवीची प्रतिष्ठापना, उत्सव काळात आयोजित केलेले कार्यक्रम तसेच गरबा, दांडिया कार्यक्रमादरम्यान घ्यावयाची खबरदारी, वेळेची मर्यादा, आवाजाची तीव्रता कमी ठेवणे, महिला वर्गाची सुरक्षितता, लहान मुलांची काळजी तसेच कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाची मदत इत्यादी अनेक विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे नियोजन एल. आय. बी. चे सागर आढारी, सुभाष मालुसरे यांनी केले होते.
















