न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री निधन झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वन करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या घरी आज भेट दिली. लांडगे परिवाराच्या दुःखात सहभागाची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राहुल कुल, आमदार माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बाळा भेगडे, प्रदेश मंत्री अमित गोरखे, शंकर जगताप आदी उपस्थित होते.
















