न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- चिंचवड येथे दोघांनी दगडांनी ठेचून तरुणाचा खून केला आहे. तरुणाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुणाल प्लाझा सोसायटीच्या पार्किंग मध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. हा प्रकार शनिवारी (दि. २४) रात्री साडेदहाच्या दरम्यान दवाबाजार, आनंद नगर, चिंचवड येथे घडला.
सागर कांबळे (वय २२, रा. आनंदनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला व पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोघेजण सागरसोबत दिसत आहेत.
मागील आठवड्यात सागरने एका मुलीची छेड काढली होती. त्यावरून त्याला मारहाण झाली होती. त्याला दारूचेही व्यसन होते. रात्री तिघेजण कुणाल प्लाझा सोसायटीच्या पार्किंगमध्ये आले. तिथे त्यांचा वाद झाला. दोघांनी सुरुवातीला सोसायटीच्या पार्किंग मध्ये असलेल्या गाळ्यांच्या समोर मारहाण केली. तिथे सागरचा रक्तस्त्राव झाला. त्यानंतर आरोपींनी सागरला जखमी अवस्थेत सोसायटी समोरील अंगणात भिंतीजवळ आणले आणि दगडाने त्याचे डोके ठेचले. यात सागरचा मृत्यू झाला. पोलीस पथके आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
















