न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- रिक्षाला हात लावू नको म्हणत आरोपीने भांडणास सुरुवात केली. याच भांडणात त्याने फिर्यादीच्या हातावर व पोटावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले आहे.
तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २३) चिखलीतील कृष्णानगर भाजी मंडईजवळ घडला. कैलास दशरथ खाडे (वय २३ रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विनायक राजु ननवरे (वय २१ रा. चिखली) व दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस पुढील तपास घेत आहेत.
















