न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- दारू पिण्याच्या बहाण्याने चऱ्होली बुद्रुक येथे तरुणाला नेले. तिथे त्याच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा मृतदेह गुलमोहर सोसायटीच्या समोरील ओढ्यात फेकला.
दोन आठवडे मृतदेह पाण्यात होता. हा प्रकार शनिवारी (दि. २४) चऱ्होली बुद्रुक येथे उघडकीस आला. गणेश लक्ष्मण गायकवाड (वय ३४, रा. हडपसर, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.
मयताचा चुलत भाऊ तुषार हरिदास गायकवाड (वय ४०, रा. धनकवडी, कात्रज. मूळ रा. रिसे, ता. पुरंदर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद जहीर सुनशरीफ शेख उर्फ सलीम (वय ३४, रा. लोहगाव, पुणे), गिरीश गुलाब गायकवाड (वय ४४, रा. लोहगाव, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
















