- रिक्षाने मुली पाठवुन दलाली खाणारा गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- काका नाव वापरून ७४९८४४१५४५ या क्रमांकावरून ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवतो. मोबाईलवरुन फोटो पाठवुन मुलींची निवड करण्यास सांगुन दिघी, आळंदी, भोसरी परीसरातील वेगवेगळे हॉटेल लॉजेस गि-हाईकांना बुक करण्यास सांगुन त्या ठिकाणी रिक्षाने मुली पाठवुन दलालीचे काम करतो, अशी माहिती अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली.
पोलिसांनी दिघी पोलीस स्टेशन हद्दीत लॉज बुक करुन त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवला व मंगळवारी (दि. २७) सापळा रचुन छापा टाकुन आरोपीला ताब्यात घेतले. त्या आरोपीच्या ताब्यातून तीन पिडीत मुलींची सुखरुप सुटका करण्यात आली. आरोपीकडून पोलिसांनी रोख रक्कम दिड हजार रुपये, ९० रुपयांचे इतर साहित्य, ६ हजार रुपयांचा मोबाईल, ५५ हजार रुपयांची एक टीव्हीएस कंपनीची रिक्षा असा एकुण ६२ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जगन्नाथ उर्फ काका परशु ठोंबरे (वय ५५ रा. जाधवनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ७४९८४४१५४५ या मोबाइल क्रमांक धारकावर दिघी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.