न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- मंत्रालयात कामाला आहे. भूसंपादन खात्यात नोकरी लावतो, असे आरोपीने फिर्यादीस सांगितले. नोकरी लावण्यासाठी फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी दीड लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादीस नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली.
ही घटना जुलै २०२० ते २७ सप्टेंबर २०२२ या दरम्यान चिखली आणि वाकड येथे घडली. अभिजित सोमनाथ शिंदे (वय ३१, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल शहाजी पाटील (रा. उस्मानाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.