न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्याबाबत तरुणीच्या घरी समजले. याबाबत फिर्यादी यांनी तरुणीच्या घरी सांगितले असा तरुणाला संशय होता. त्यावरुन त्याने फिर्यादींसोबत वारंवार वाद घातला.
रविवारी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी शिवराज नगर येथे चिकन आणण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना अडवले आणि मारहाण केली. लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. हा प्रकार रविवारी (दि. २५) रात्री शिवराज नगर, रहाटणी येथे घडला.
अतुल उल्हास आढाव (वय २६, रा. रहाटणी) यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आदित्य अशोकराव उतकर (वय २०, रा. रहाटणी) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.