न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- लोणावळा परिसरात काही दिवसांपूर्वी फिर्यादीची आरोपीशी भेट झाली होती. बंगळुरू येथे एक जुनी वास्तू पाडण्यात आली. तेथे मला सोन्याच्या विटा आणि हिरे असलेली पिशवी सापडल्याचे आरोपीने फिर्यादीला सांगितले.
सोन्याच्या विटा आणि दागिन्यांची विक्री करायची असल्याचे आरोपीने सांगितले. त्यानंतर त्या वस्तू विक्री करत फिर्यादीकडून दहा लाख रुपये घेतले. त्या बदल्यात बनावट सोन्याची विट आणि हिरे देऊन आरोपीने पलायन केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या संचालकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. भीमा गुलशन सोलंकी (मूळ रा. बडोदा, गुजरात, सध्या रा. देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.