न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२२) :- जयपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीयकृत किक बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या दोघांना सुवर्णपदक मिळाले आहे. तर दोघांना रौप्य पदक प्राप्त झाले आहे. प्रवीण वाघ आणि ऑस्तीन रोडरिक्स याला ६५ आणि ६० किलोमध्ये लो किक बॉक्सिंग स्पर्धेत हे पदक प्राप्त झाले. तर सागर पवार, मयांक कदम याला रौप्य पदक प्राप्त झाले आहे.
जयपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीयकृत किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने २१ सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेसाठी भारताचा २१० खेळाडूंचा संघ दाखल झाला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडच्या १३ जणांचा समावेश आहे. स्पर्धेला २७ सप्टेंबरपासून सुरूवात झाली.
पहिल्याच दिवशी पिंपरी – चिंचवडमधील खेळाडूंनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. प्रवीण वाघ याने ६५ किलो वजन गटात लो किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. वाघ चिंचवड येथील रहिवाशी आहे. तर ऑस्तीन रोडरिक्स याला ६० किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. या बरोबरच फुल कॉन्ट्रॅक्ट प्रकारात सागर पवारला ७० किलो वजन गटात लो किक प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. तर मयांक कदम याने सब ज्युनिअर गटामध्ये ३५ किलो गटामध्ये रौप्यपदक पटकावून पहिला दिवस गाजवला.