न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२२) :- फिर्यादी महिलेचे आरोपी महिलेशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यातून त्यांचे इतर आरोपींशी पारिवारिक संबंध निर्माण झाले. त्याचा फायदा घेऊन सर्व आरोपींनी वेळोवेळी फिर्यादी महिलेकडून चेकने व ऑनलाईन असे ५.६४ लाख रुपये तसेच बाहेरून व्याजाने ४ लाख रुपये घेऊन आरोपींना देण्यास भाग पाडले.
तसेच फिर्यादीने आरोपींकडे विश्वासाने दिलेली १० तोळे सोन्याचे गंठण तसेच आरोपींनी एकत्रित कट रचून फिर्यादीस सर्व दागिने आमच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी द्या असे सांगून या महिलेकडून सुमारे २० तोळे वजनाचे दागिने देण्यास भाग पाडले, असे एकूण ३० तोळे वजनाचे दागिने फिर्यादीने आरोपींना विश्वासाने सुपूर्त केले असता परस्पर फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवून त्यावर कर्ज काढले आहे.
हा प्रकार जानेवारी २०१७ ते २८ सप्टेंबर २०२२ दरम्यान घडली आहे. पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर पाठक, श्रद्धा पाठक व श्रेया पाठक, (सर्व रा. गणेशनगर, वाकड) या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.