न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२२) :- फिर्यादी तरुणी साॅफ्टवेअर इंजिनियर आहे. फिर्यादी तिच्या पतीसह घरी असताना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादीच्या मोबाइलवर अनोळखी आरोपीने व्हाॅटसअपचा व्हिडिओ काॅल केला.
फिर्यादीने काॅल उचलला असता आरोपीने पूर्ण नग्न होऊन अश्लील कृत्य केले. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करून आरोपीने फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. बुधवारी (दि. २८) सकाळी साडेअकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. पीडित तरुणीने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.