न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२२) :- मावळातील सोमाटणे फाट्यावरील लडकत पंपाजवळील हायपावर विद्युत वाहिनीच्या टॉवरवर गुरुवारी एक माथेफिरू चढला होता. त्यानंतर तो हाय पावर टॉवरच्या टोकावर गेला व त्याने विद्युत वाहिनीची तार पकडली.
याची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस प्रशासनाने तत्परता दर्शवून विद्युत पुरवठा लगेच बंद केला. त्यामुळे संबंधित व्यक्तीला शॉक बसला नाही. चिखलात पडल्याने जीव वाचला.
तारेला लोमकळत पुढे पुढे सरकत असताना हात निसटून एवढ्या उंचावरून तो खाली पडला. या वेळी पावसामुळे खाली चिखल असल्याने त्याला मुका मार लागला. पोलिस प्रशासनाने त्वरित रुग्णवाहिका बोलवून त्याला तळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.