न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२२) :- आपसात संगनमत करून फिर्यादीस कर्ज देण्याच्या बहाण्याने दोन लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी सात कोरे धनादेश घेतले आहेत. हा प्रकार ४ मे २०१९ ते २९ सप्टेंबर २०२२ या दरम्यान डांगे चौक, वाकड येथे घडला.
आरोपींनी फिर्यादींप्रमाणे इतर लोकांना देखील कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवले आहे. अनिल शरद अहिरराव (वय ४९, रा. चिखली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बालाजी बळीराम घोडके (वय ३२, रा. दौंड), संग्राम यादव (वय ४५, रा. कोल्हापूर), बालाजी फायनान्सचे मालक मुजावर (रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.