न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२२) :- वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास त्यावर ४० टक्के परतावा मिळेल, असे फिर्यादीला आमिष दाखवले. फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना टप्प्याटप्प्याने २३ लाख रुपये गुंतवणूक करण्यास आरोपींनी भाग पाडले.
त्यांनतर फिर्यादींना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट २०२२ ते २९ सप्टेंबर २०२२ या दरम्यान नवी सांगवी येथे घडला. रणजित महादेव ढोमसे (वय ४०, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन शहा, राहुल मेहरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.