न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात प्रतिदिन १०० किलो कचरा निर्माण करणा-या गृहसंस्था, इतर आस्थापनांना निर्माण होणा-या ओला (जैव विघटनशील) कच-याची विल्हेवाट २ ऑक्टोबर २०२२ पर्यंत त्यांच्याच आवारात कंपोस्टिंग, बायोमिथनायझेशन अथवा अन्य तंत्रज्ञानाद्वारे लावणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन केल्यास सुरुवातीला ५००० व त्यानंतर १५००० दंडाची रक्कम आहे.
याबाबत विविध संघटना, हाऊसींग फेडरेशन, गृहनिर्माण संस्था यांच्या प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे व समक्ष भेटून ओल्या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा अवधी नसल्याने त्याच्या अंमलबजावणीकरिता मुदत मागितली आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी ३१ ऑक्टोबर २०२२ अखेरपर्यंत गृहसंस्था अथवा इतर आस्थापनांना अंतिम मुदत दिली आहे.















