न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२२) :- साई एन्टरप्रायजेस या कंपनीत आरोपी स्वच्छतेचे काम करत होता. त्याने कंपनीच्या शेडचे काम करणाऱ्या आर.बी.टेक्नोक्रस्ट कंपनीची ३३ हजार ८० रुपयांची कॉपर व अल्यूमिनीयमची इलेक्ट्रीक वायर चोरली.
हा प्रकार शुक्रवारी (दि. ३०) सकाळी साडे सहा वाजता एमआयडीसी भोसरी येथे घडला. तिर्थ राजसिताराम यादव (वय ४९ रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. सुनिल जय भगवान चव्हाण (रा. पिंपरी) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.















