न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२२) :- दुचाकीवरून फिर्यादीच्या वहिनी रस्त्याने जात होत्या. मोशीतील हवालदार वस्ती येथे आल्यावर त्यांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या.
अपघात घडल्यानंतर आरोपी पिकअप चालक घटनास्थळी न थांबता तसेच पोलिसांना माहिती न देता पळून गेला. हा प्रकार मंगळवारी (दि. २७) सायंकाळी घडला. राहुल सुदाम आल्हाट (वय ३६, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















