न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२२) :- महिलेला पैशांचे आमिष दाखवले. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी चऱ्होली खुर्द येथील लॉजवर छापा मारला.
पीडित २८ वर्षीय महिलेची वेश्या व्यवसायातून सुटका केली. तसेच दोघांकडून ७९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. जितेंद्र सुनील चौधरी (वय २४, रा. भोसरी), महिला (वय ३४, रा. भोसरी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
















