न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२२) :- दारु पिऊन आरोपीने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
ही घटना बुधवारी (दि. ५) रोजी रात्री १२.१५ च्या सुमारास घडली. याबाबत भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी विकास ससाणे (वय ३३ वर्षे, रा. गांधीनगर बौध्दविहारच्या पाठीमागे पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















