न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२२) :- विजयादशमी आणि श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आळंदी रस्त्यावरील श्री साई मंदिरामध्ये मंगळवार ते गुरुवार विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विजयादशमीनिमित्त बुधवारी श्री साईबाबा यांची माध्यान्ह आरती अनंत विभूषित धर्म सम्राट जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णदेव नंदगिरी जी महाराज. पिठाधीश्वर, सूर्यपिठ, मुरली मंदिर, जुना आखाडा, द्वारका, गुजरात यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी माजी खासदार अमर साबळे, मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे आणि भक्त भाविक उपस्थित होते.
मंगळवारी पहाटे पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा गुरुवारी सांगता समारोह झाला. यामधे पहाटे ५:३० वाजता मंगल स्नान, साईबाबांची पाद्यपूजा, सकाळी श्रींची आरती, गुरुस्थान येथे रुद्राभिषेक, सकाळी ११ वाजता गोपाळकाला, माध्यान्ह आरती, धुपारती, साई भजनमाला आदि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली.