न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२२) :- विनापरवाना बेकायदेशीररित्या एक देशी बनावटीचे पिस्तुल व एक जिवंत काडतुस जवळ बाळगले असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (दि. ५) रोजी साडेआठ च्या दरम्यान चाकण येथील कडाचीवाडी गावाच्या हद्दीतील बापदेवस्ती येथे कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तुल व एक जिवंत काडतुस अशा एकूण ४१,००० च्या वस्तू जप्त केल्या आहेत. याबाबत गुन्हे शाखा, युनिट ३ चे पोलीस शिपाई योगेश्वर औदुंबर कोळेकर (वय ३४ वर्षे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आदिनाथ भाउसाहेब झिंजुरके (वय २१ वर्षे, रा. कडाचीवाडी, ग्रामपंचायत जवळ, ता.खेड जि.पुणे) याच्यावर १५७८/२०२२, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) सह कलम महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
















