न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- शहरातील रस्त्यांच्या डागडुजीकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. याच्याविरोधात शहर मनसेच्या वतीने पालिकेतील आयुक्तांच्या दालनाबाहेर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. तातडीने योग्य प्रकारे रस्ते डागडुजी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे. आंदोलनकर्त्यांनी आयुक्त व प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरात सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच, दुर्लक्ष शहरासाठी महत्त्वाचा असा असलेला निगडी ते दापोडी या मार्गावरील मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना कसरत करावी लागत आहे.
खड्ड्यात वाहनांची चाके आपटून दुर्घटना होत आहेत. त्यामुळे सर्व भागांतील खड्डे तातडीने दुरुस्त करून बुजवून घ्यावेत. अन्यथा आंदोलनाचा इशारा शहराध्यक्ष चिखले यांनी दिला आहे. आंदोलनात महिला शहराध्यक्षा अश्विनी बांगर, राजू सावळे, विशाल मानकरी, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी आदी सहभागी झाले होते.
















