न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पेठ क्रमांक १२ प्रधानमंत्री आवास अर्जाची मुदत दि. १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने पेठ १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत इडब्लूएस गटाकरिता (अनुसूचित जमाती) करिता २९ सदनिका व विमुक्त जातीसाठी २ सदनिका, ३१ सदनिका व एलआयजी प्रवर्गातील ७९३ सदनिका व पेठ क्र. ३०-३२ येथील एडब्ल्यूएस प्रवर्गातील ३६६ सदनिक एलआयजी प्रवर्गातील ४१४ सदनिकांचा सर्वसुविधांनीयुक्त असा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प साकारण्यात येत आहे. प्रकल्पातील घरे डिसेंबर २०२२ ताबा देण्याचे नियोजीत आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते, त्याची मुदत दि. ३ ऑक्टोबर 2०२२ रोजी संपुष्टात आली; परंतु नागरिकांच्या विनंतीवरून ही मुदत १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
त्यानुसार, दि. १८ अखेर नोंदणी करून नागरिक ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याकरता www.pmrda. gov.in http://lottery.pmrda. gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. वाढीव मुदतीच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ करून घ्यावा व मुदतीपूर्वी Online अर्ज सादर करावेत, असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
















