- मेडिकलमधून औषधे नेत मालकालाही घातला गंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- भोसरी येथील डॉक्टरला तिघांनी धमकावले. त्यांच्याकडे महीन्याला सात हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. तो न दिल्यास दवाखाना चालू देणार नाही, अशी धमकी देत शेजारील मेडिकल दुकानातून पैसे न देता औषधे नेली.
ही घटना सायंकाळी (दि. ५) रोजी ६.१० च्या सुमारास पुरुषोत्तम क्लीनीक, शास्त्री चौक, आळंदी रोड आनंदनगर चौक येथे घडली. याप्रकरणी पुरषोत्तम कारभारी राजे, (वय ४२, रा. सेक्टर नं १, सूर्यदर्शन अपार्टमेंट, बी २१७, इंद्रायणीनगर भोसरी पुणे ३९) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुदर्शन ऊर्फ पिल्या संभाजी राक्षे (वय २५), गोंविदा कोळी (वय २४), सचिन सारसे ऊर्फ काळा सच्या (वय २३, सर्व रा. आनंदनगर भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पुरुषोत्तम क्लीनीकमध्ये होते. तिथे येवून आरोपी सुदर्शन याने फिर्यादीस ” तुला मला दर महीन्याला सात हजार रुपये हप्ता म्हणुन दयावे लागतील. तरच तु दवाखाना चालवु शकतो, नाहीतर तुला दवाखाना चालवु देणार नाही, व इलाक्यात फिरु देणार नाही, मादरचोद दर महीन्याला आरोपी गोविंदा व काळा येवुन तुझ्याकडुन सात हजार रुपये घेवुन जातील ”, असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ केली. तसेच श्रेयश मेडीकलचे मालक रोहीदास घेनंद यांना यांच्या मेडीकलमधुन औषध घेवुन जावुन त्यांना “ए माकडा कसले पैसे मागतो मी कधी कोणाला पैसे देतो का तुला माहीत नाही काय” असे म्हणून ते तिघे तेथुन निघुन गेले. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















