- पिडीतेशी जबरदस्तीचा प्रयत्न; पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- पिडीत तरुणीला व्हिडीओ कॉल करुन ” तूझे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ व्हायरल करेल”, अशी धमकी दिली. पिडीतेला लॉजवर नेऊन तसेच पिडीतेच्या घरी तिच्यावर जबरदस्ती केली. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२२ दरम्यान चेतन लॉज, चाकण येथे व खराबवाडी येथे घडला.
पिडीत तरुणीने चाकण-म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव यादव (वय २१ वर्षे रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चाकणच्या व्यंकटेश या खाजगी कंपनीत काम करीत असताना त्यांचे आणि आरोपीमध्ये मैत्रिचे संबंध निर्माण झाले. फिर्यादी चाकण खराबवाडी येथे राहत असताना फिर्यादीच्या मोबाईल फोनवर व्हिडीओ कॉल करुन फिर्यादीचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ डिलीट करण्याच्या बहाण्याने फिर्यादीस चाकण येथील चेतन लॉजवर नेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच वेळोवळी फिर्यादीस व्हिडीओ कॉलकरुन तूझे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
















