न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- ब्रम्हाकॉर्प लि. ही रामकुमार अगरवाल यांची कंपनी असून ते संचालक आहेत. त्यांच्यावतीने जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये राजेश पिल्ले विश्वस्त प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते.
त्यांनी चर्होली येथील मिळकत कंपनीचे संचालक रामकुमार अगरवाल यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे आणि धनंजर हनंमत लांडगे (रा. पिंपरी) यांना खरेदी खताने विक्री केली.
ब्रम्हाकॉर्प कंपनीचा विश्वासघात करुन १५ कोटी रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली़. संजय दयानंद ओसरमल (वय ३९, रा. पिंपरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले ऊर्फ राजेश पिल्ले (वय ५२, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ते भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आहेत.