न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- राज्य निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व पोट निवडणूकीपुरते ‘ धनुष्यबाण’ चिन्ह आणि शिवसेना ‘ नाव गोठवण्याबाबतचा आज महत्वाचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. सोमवारपर्यंत दोन्ही गटांना नव्या चिन्हाची निवड करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
दरम्यान ही कारवाई केवळ पोटनिवडणुकीसाठी असून विस्तृत निकाल यायला बराचसा अवधी लागू शकतो, अशी शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे तर, शिवसेनेच्या अट्टहासासाठी बंड करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुरती गोची झाली आहे.















