न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२२) :- शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळया कंपनीचा गुटखा, सुगंधीत तंबाखु व पानमसाला हा स्वतःच्या फायद्याकरीता आरोपीने अवैधरित्या खरेदी करुन जवळ बाळगला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला अटक केली.
त्याच्याकडू ९४,८९७ रुपये किंमतीचा माल आणि १०,००० रुपये किं.चा एक मोबाईल असा एकुण १,०४,८९७ रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई (दि. ७) रोजी ४.२० च्या सुमारास हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील तांबोळी प्लॉटींग, साखर कारखान्याजवळ, कासारसाई, हिंजवडी येथील अलिम बाबा शेख बिल्डींगमधील तळमजल्यावरील रुम नं. ३ मध्ये केली.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई सदानंद विजय रुद्राक्षे यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी भुमाराम उर्फ राजु बुदधराम पटेल (वय २८ वर्षे रा. तांबोळी प्लॉटींग, अलिम बाबा शेख यांची बिल्डींग मधील रुममध्ये साखर कारखान्याजवळ, कासारसाई, हिंजवडी), आरोपी प्रदीप (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.


















