न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२२) :- ॠतुरंग फाउंडेशनच्या वतीने चाकण परिसरातील कातकरवस्ती, पठारेवाडी येथे गोरगरीबांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी (दि. २२) दुपारी दोन वाजता त्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनच्या वैशाली आघाव यांनी दिली.
या वेळी पिंकी टिलोकचंदाणी, नितीन मोरे आणि केशव आघाव हे उपस्थित राहणार आहेत.


















