न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२२) :- मध्य प्रदेशातील इंदौरहुन रावेतमधील मुलांना भेटण्यासाठी फिर्यादी महिला या राजरतन ट्रॅव्हल्स (एमपी ४१ पी ५०५५) या खासगी बसने वाकड इथपर्यंत प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने २,९५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरी करुन नेली आहे.
हा प्रकार (दि. १८) रोजी रात्री ८.४० ते (दि. १९) रोजी सकाळी ८.४५ वाजता घडला. फिर्यादी महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रावेत पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















