न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२२) :- उद्या शुक्रवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी गो पूजनाने दिवाळीला सुरुवात होणार आहे. तसेच आकाश कंदील, पणत्या, लाइटमाळा व सजावटीचे साहित्य बाजारात दाखल होऊ लागले आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षे सर्वच सणांवर निर्बंध होते. यंदा निर्बंधाचे ढग दूर झाल्याने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि विजयादशमीचा सण जल्लोषात साजरा झाला. त्यामुळे प्रकाश आणि नवचैतन्याचा दिवाळी सणदेखील उत्साहात साजरा होणार आहे. देशभरात सर्वत्र हा सण साजरा केला जातो.
दिवाळीतील फराळ, नवीन कपडे, फटाके, रंगीबेरंगी पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या आणि गर्दीमुळे बाजारपेठेत उत्साह दिसून येतोय. दिवाळीत लाडू, करंज्या या गोडपदार्थाबरोबरच चिवडा फराळाच्या पदार्थाचे आकर्षण सर्वांनाच असते. त्यामुळे लक्ष्मीपूजनापूर्वीच फराळाची तयारी गृहिणींमध्ये दिसून येते. हल्ली महिला वर्गाचे नोकरी करण्याचे प्रमाणही मोठे असल्याने तयार फराळ पदार्थ घेण्यास पसंती दिली जाते.
असे आहेत मुहूर्त…
■ शुक्रवार (दि. २१) वसुबारस असून, या दिवशी गोवत्स दिवाळीला सुरुवात होईल.
■ शनिवारी धनत्रयोदशी
■ सोमवारी लक्ष्मीपूजन
■ बुधवारी (दि. २६) बलिप्रतिपदा भाऊबीज आणि दिवाळी पाडवा साजरा करण्यात येणार आहे.


















