- एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑक्टोबर २०२२) :- मॉन्डेसिर प्रोजेक्टस इंडिया प्रा.लि. कंपनीच्या नावाचे बनावट लेटरहेड बनवले. त्यावर बनावट वर्क ऑर्डर बनवली. बनावट शिक्के व सह्या करुन बनावट वर्क ऑर्डर दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, यवतमाळ यांच्या न्यायालयात सादर करीत दावा दाखल केला. फिर्यादीची फसवणुक केली.
ही घटना (दि. १५/०१/२०२२) रोजी यवतमाळ येथे घडली. फिर्यादी दिनेश रमण पाटील (वय ३६ वर्षे, कार्या पत्ता:- प्लॉट नं-४२०, जे-ब्लॉक, एमआयडीसी भोसरी, रा:- नक्षत्र, फेज-२, ए ७०३, स्पाईन रोड, पुर्णानगर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी अंकुश विजय कोटेचा (वय: ३० वर्षे, रा. प्रगती सोसायटी, वडगाव रोड, यवतमाळ) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















